esakal | नागपुरात ६१ हजार नवीन लसी, पाच केंद्रावर १८ वर्षांवरील लसीकरण सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

नागपुरात ६१ हजार नवीन लसी, पाच केंद्रावर १८ वर्षांवरील लसीकरण सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला (corona vaccination) गती देण्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी (corona vaccine) प्राप्त झाल्या आहेत. सोबतच आणखी ऑक्सिजनचे (oxygen) चार टँकर वायुदलाच्या विशेष विमानाने ओडिसा (odisha) राज्यातील अंगूळ येथील स्टील प्लांटला रवाना करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी चार ऑक्सिजन टँकर (oxygen tanker) शहरात पोहोचण्याची शक्यता आहे. (61 thousand vaccine dose arrived in nagpur)

हेही वाचा: कुटुंबातील आठही जणांना एकाचवेळी कोरोनाची लागण, आई ऑक्सिजनवरही असूनही केली मात

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ४५ हजार कोव्हीशिल्ड तर १६ हजार कोव्हॅक्सिन प्राप्त झाल्या आहेत. नव्याने प्राप्त झालेल्या १६ हजार कोव्हॅक्सिनमधून ग्रामीण भागातील सावनेर, कामठी येथील केंद्रावर, तर नागपूर शहरातील महाल, छापरू स्कूल, मानेवाडा यूपीएचसी या केंद्रावर १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण केले जात आहे. अन्य ४५ हजार लसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

जिल्ह्यातील ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता ओरीसा राज्यातून ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. काल चार टँकर वायुदलाच्या विशेष विमानाने रवाना झाले होते. गुरुवारी पुन्हा चार टँकर रवाना करण्यात आले. ओडीसा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगूळ येथील स्टील प्लांट मधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. जिल्ह्यासाठी गुरुवारी एकूण ४ हजार ४८५ रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील १५६ तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खासगी रुग्णालयांना त्याचे वाटप करण्यात आले.