

Lakdaganj police investigate a major ₹6.25 crore fraud
esakal
नागपूर : लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन दालमिल मालकांना दोन हजार टन चणा देण्याच्या बहाण्याने ॲडव्हान्स घेऊन त्यांची ६ कोटी २५ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी पन्नालाल प्यारचंद सेवक (वय ६४, रा. बाबुळबन, सेंट्रल एव्हेन्यू) आणि निखिल मनोहर भोजवानी (वय ३४, रा. वैष्णोदेवी चौक, वर्धमाननगर) यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.