
नागपूर : सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्राणवायूचा पुरवठा करणारे वृक्ष महत्वाचे आहेत. पण उपराजधानीतील जवळपास ६९० वृक्ष विविध विकासकामांसाठी तोडणार आहेत. मनपाच्या उद्यान विभागाने यासंदर्भात आक्षेप मागविले आहेत. शेकडो पर्यावरण प्रेमी याविरोधात एकवटले आहेत.