esakal | कोरोनामुळे मृत्यूची त्सुनामी! आज ७३ मृत्यू, तर साडेपाच हजार नव्या रुग्णांची भर

बोलून बातमी शोधा

73 corona patients died in nagpur district today nagpur corona update

दोन दिवसांपासून ५ हजार नव्याबाधितांची शृंखला कायम राहिली आहे, यामुळे या दोन दिवसात नागपुरात १० हजार ८५२ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १३९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे नागपुर जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ५ हजार ५७७ झाली आहे.

कोरोनामुळे मृत्यूची त्सुनामी! आज ७३ मृत्यू, तर साडेपाच हजार नव्या रुग्णांची भर
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना या विषाणूची नागपूर जिल्ह्यात अक्षरश: त्सुनामी आली आहे, असे चित्र तयार झाले. वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या दर दिवसाला नवीन विक्रम करीत आहे. त्या तुलनेत मृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणात फुगत आहे. बुधवारी ६६ मृत्यू आणि ५ हजार ३३८ बाधितांची भर पडली. कालचा रेकार्ड पुन्हा मोडित निघाला. गुरूवारी (ता.८) ७३ जणांचा मृत्यू झाला. तर ५ हजार ५१४ कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे प्रशासन पुरते हादरले आहे. यामुळे प्रशासनाची निर्णय घेण्याची क्षमता देखील हरवत असल्याचे दिसून येत आहे. 

दोन दिवसांपासून ५ हजार नव्याबाधितांची शृंखला कायम राहिली आहे, यामुळे या दोन दिवसात नागपुरात १० हजार ८५२ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १३९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे नागपुर जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ५ हजार ५७७ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता २ लाख ५९ हजार ७३५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. 

हेही वाचा - 'ते' ७५ जण सेवा द्यायला आले अन् घरी परतलेच नाहीत, रुग्णालयातच घेतला अखेरचा...

जिल्ह्यात खाटांची संख्या अपुरी आहे. अलिकडे ६ हजार ०७२ कोरोनाचे रुग्ण गंभीरावस्थेत असून यातील ८० टक्के रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाची अतिशय बिकट स्थिती आली आहे. २ हजार २७७ जणांनी कोरोनावर मात केली. ठणठणीत बरे होऊन ते घरी परतले. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ लाख २ लाख ९हजार ६१ झाली आहे. 

जिल्ह्यत ४५ हजार ९६कोरोनाबाधित -
सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ४५ हजार ९६ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ३३ हजार ५०१ जणांना लक्षणे नसल्याने घरातच त्यांना विलगीकरणात ठेवले गेले आहे. मात्र, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्यामुळे आगामी चार ते पाच दिवसात गंभीर संवर्गात परावर्तित होत आहेत. ही धोक्याची घंटा आहे. सद्या गंभीरावस्थेतील रुग्णांची संख्या ६ हजार ७२ असून विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - विदर्भात कोरोनाचा कहर! एका दिवसांत १० हजारांवर पॉझिटिव्ह, तर ११९ जणांचा मृत्यू

शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित -

  • शहरात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित - २९ हजार ७२१ 
  • शहरात आतापर्यंत आढळलेले कोरोनाबाधित - १ लाख ९९ हजार ६९४ 
  • शहरात कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू - ३ हजार ४९८ 
  • शहरात कोरोनाच्या एकूण चाचण्या -१२ लाख८९ हजार ४८३ 
  • शहरातील आतापर्यंत एकूण कोरोनामुक्त -१ लाख ६७ हजार १३७ 
  • ग्रामीणमध्ये आज उपचार घेत असलेले कोरोनाबाधित -१५ हजार ३७६ 
  • ग्रामीणमध्ये आतापर्यंत आढळले कोरोनाबाधित -५९ हजार ४६ 
  • ग्रामीण भागात आतापर्यंत झालेले कोरोनबाधितांचे मृत्यू- १ हजार १८६ 
  • ग्रामीण भागात कोरोनाच्या एकूण चाचण्या -४ लाख ६८ हजार २९१ 
  • ग्रामीण भागातील एकूण कोरोनामुक्त - ४१ हजार ९३४