esakal | हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त
sakal

बोलून बातमी शोधा

file image

हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे. कोरोनामुळे यंदा शासनाने परीक्षा न घेताच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्हा परिषदेतील ७४ हजार विद्यार्थी परीक्षा न देता पास झाले आहे. मात्र, खासगी शाळांकडून शुल्क वसूलीसाठी परीक्षेचा फार्स सुरू आहे.

कोरोनाचा प्रकोप वाढलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता आस्थापना १५ दिवसांसाठी बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. मात्र, पुन्हा संक्रमण वाढल्यानंतर बंद करण्यात आले.

हेही वाचा - ५०० रुपयांची चाचणी साडेतीन हजारांत; वयासह आधार क्रमांकातही घोळ

खासगी शाळांचा टाइम टेबल -

खासगी शिक्षण संस्थांनी शुल्क वसूलीसाठी परीक्षेची तयारी सुरू केली आहे. त्यात अनेक शाळांनी तर पालकांच्या मोबाईलवर परीक्षेचा टाइम टेबलही पाठविला आहे. वर्षभर शाळा बंद असल्याने शुल्क वसुली झाली नाही. त्यामुळेच हा फंडा त्यांच्याकडून वापरला जात आहे.

हेही वाचा - खुशखबर! आणखी सात कंपन्या तयार करणार 'रेमडिसिव्हीर'

कोविडच्या काळात परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशा प्रमाणे जिल्हा परिषदेने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला.

-चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (जि.प.)

पहिली ते आठवी---१५११ शाळा

एकूण विद्यार्थी---७४ हजार