
नागपूर : महिलेच्या पोटातून काढला ८ किलोंचा गोळा
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्त्री व प्रसूतीशास्त्र विभागात उपचारासाठी आलेल्या एका महिलेच्या पोटातून अंडाशयाचा ८ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. स्त्री व प्रसूतीशास्त्र विभागातील डॉ. कांचन गोलावार तसेच डॉ. अनिल हुमणे यांनी ही शस्त्रक्रिया केली. विशेष असे की, कॅन्सरचा गोळा असल्याचे तपासणीतून पुढे आले आले.
हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी
नुकतेच अयोध्यानगर येथील ५९ वर्षीय उषा कडवे ही महिला पोटदुखीच्या वेदना घेऊन मेडिकलमध्ये उपचारासाठी आली. रुग्ण महिलेस भरती केले. सोनोग्राफी, सीटी स्कॅन करण्यात आले.अंडाशयाची गाठ असल्याचे निदानातून कळून चुकले. कॅन्सरसदृश्य गोळा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र यानंतर सर्व चाचण्या करण्यात आली. यानंतर ऑपरेशन थिएटर ‘जी''मध्ये मेडिकलमधील डॉ. कांचन गोलावार, डॉ. अनिल हुमणे यांनी ही शस्त्रक्रिया केली.डॉ. शोभना ,डॉ. शिवांगी, डॉ. तुहिना ,डॉ. वर्षा, डॉ. अपर्णा यांनी शस्त्रक्रियेत सहकार्य केले. महिलेच्या पोटातून अंडाशयाचा चक्क ८ किलोंचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. महिलेचा जीव वाचला.
हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी
हा ट्यूमर कसा तयार झाला यासंदर्भातील तपासणीसाठी बायोप्सी करणे आवश्यक होते. डॉक्टरांनी बायोप्सीसाठी हिस्टोपॅथॉलॉजीकडे पाठवले होते. कॅन्सरयुक्त गोळा असल्याचे तपासणीतून पुढे आले. ४ महिन्यांपासून पोट वाढत होते. पोट फुगारा घेत होते, परंतु वजन कमी होत होते. सुरवातीला एका आयुर्वेद तज्ज्ञाने तपासले. त्यांनी सोनोग्राफी सांगितली, परंतु त्यानंतर ती महिला मेडिकलमध्ये उपचारासाठी आली. सीटी स्कॅनसह इतर चाचण्या करण्यात आल्या सद्या महिलेची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले.
"महिलेच्या पोटातून ८ किलोचा गोळा काढण्यात आला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. विविध तपासणीतून कॅन्सरचा गोळा असल्याचे निदान झाले. सद्या किमोथेरपीसाठी महिलेस पाठवण्यात येईल. रुग्णमहिलेची प्रकृती उत्तम आहे.''
-डॉ. कांचन गोलावार, सहयोगी प्राध्यापक, स्त्री व प्रसूतीरोग विभाग, मेडिकल
Web Title: 8 Kg Lump Removed From Woman Stomach Survived By Timely Operation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..