'सांगा निकाल लावायचे कसे'? विद्यापीठाच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांमागे लावले कोरोनाचे काम

80 percent employees of nagpur university are on corona duty
80 percent employees of nagpur university are on corona duty

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत असल्याने त्याविरुद्ध लढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ८० टक्के कर्मचारी मागविले आहे. ऐन निकालाच्या वेळी विद्यापीठाकडून अशाप्रकारे ८० टक्के कर्मचारी कोरोनासाठी गेल्यास निकाल लावायचा कसा ? असा प्रश्न आता विद्यापीठाला पडला आहे.

राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला आहे. याप्रकाराने विद्यापीठातील विविध विभाग आणि महाविद्यालये बंद करण्यात आलेत. याशिवाय सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्यात. याशिवाय सरकारने दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठात १५ टक्के कर्मचाऱ्यांना बोलाविण्याचेही आदेश देण्यात आले. यानंतर एक महिन्यापूर्वी अंतिम वर्षाचा निकाल वगळून इतर निकाल लावण्याबाबत सरकारकडून आदेश देण्यात आले. 

यानुसार विद्वत परिषदेची बैठक घेण्यात येऊन निकाल लावण्याचे निर्देश देण्यात आले. यातून विद्यापीठाद्वारे निकाल लावण्यास सुरुवात करण्यात आले. येत्या चार पाच दिवसात निकालाची गाडी रुळावर येईल असे वाटत होते. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठाचे ८० टक्के कर्मचारी कोरोनाच्या कामासाठी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. 

विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू आहेत. अद्याप निकाल लागले नसल्याने दुसऱ्या, तिसऱ्या,चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या आणि इतर सत्राचे प्रवेश अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे या सत्रांचे निकाल लावणे गरजेचे आहे. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठाचे ८० टक्के कर्मचारी कोरोनाच्या कामासाठी बोलाविण्यात आल्याने निकाल लावायचे कसे ? हा प्रश्न विद्यापीठासमोर पडला आहे.

इतरही कामे पेंडींग

विद्यापीठात ४० हुन अधिक अभ्यासक्रमाचे विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. याशिवाय पंचविसहुन अधिक विभाग आहेत. परीक्षेसह इतरही कामे असतात. या सर्व विभागाचा कार्यभार १५ टक्के कर्मचारी सांभाळत आहे. गेल्या अनेक दिवसापासून विद्यापीठाचे कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.

"विद्यापीठाचे निकाल लावने ही विद्यापीठाचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र, ८० टक्के कर्मचारी कोरोनाच्या कामासाठी बोलाविल्याने निकाल लावायचा कसा याबाबत प्रश्नचिन्ह आहे."
डॉ. सुभाष चौधरी,
कुलगुरू, 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com