
नागपूर : दिल्लीत आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या १५ दिवसांवर आले आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर जोरदार तयारी सुरू आहे. संमेलनस्थळी विविध प्रकाशन संस्था पुस्तकांचे नव्वद स्टॉल्स लावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मात्र, यामध्ये नागपुरातील एकाही प्रकाशन संस्थेचा स्टॉल राहणार नसल्याचे कळते.