रॅश ड्रायव्हिंग जिवावर बेतली; १५ वर्षांचा मुलगा अपघातात ठार

रॅश ड्रायव्हिंग जिवावर बेतली; १५ वर्षांचा मुलगा अपघातात ठार

नागपूर : एका १५ वर्षीय मुलाला रॅश ड्रायव्हिंग (Rash driving) करणे जिवावर बेतले. भरधाव बाईकचा ट्युब फुटल्यामुळे नियंत्रण सुटून बाईक दुभाजकावर आदळली. झालेल्या अपघातात बाईकस्वार मुलगा गंभीर जखमी (Seriously injured) झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीयूष ठाकरे (१५, रा. पांढराबोढी) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. (A 15-year-old boy was killed in an accident in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष ठाकरे हा दहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील कॅनरा बॅंकेत सिक्युरिटी गार्ड आहेत. जयनगर येथे राहणाऱ्या प्रवीण बलितकुमार बारसिंगे (३०) या किराणा दुकानदाराशी त्याचे घरगुती संबंध होते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा वाजता पीयूषने बारसिंगे यांना दुचाकी मागितली. तो दुचाकी घेऊन अंबाझरी बायपास रोडने जात होता.

रॅश ड्रायव्हिंग जिवावर बेतली; १५ वर्षांचा मुलगा अपघातात ठार
वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

पीयुषने वेगात दुचाकी चालविल्याने मागचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी डिव्हायडरवर चढली. पीयूषच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रविनगर येथील सेनगुप्ता हॉस्पिटल येथे नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी वाहनमालक प्रवीण बारसिंगे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेल्मेट असते तर...

पीयूष ठाकरे नुकताच बाईक चालवणे शिकला होता. त्यामुळे तो अधून मधून कुणाचीही दुचाकी घेऊन फिरायला जात होता. शुक्रवारी १२ वाजता बारसिंगे यांची दुचाकीची चाबी मागितली आणि दुचाकी घेऊन बाहेर पडला. तो भरधाव दुचाकी चालवत होता. मात्र, त्याने हेल्मेट घातले नव्हते. जबरदस्त अपघात झाला आणि पीयूषचे डोके डिव्हायडरवर आदळले. डोक्याला जबर इजा झाली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. जर पीयूषने हेल्मेट घातले असते तर कदाचित तो वाचला असता.

(A 15-year-old boy was killed in an accident in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com