वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

पुसद (जि. यवतमाळ) : सुरुवातीला चहा कॅन्टिनवर उदरनिर्वाह करताना मुलगा नीरजला एमबीबीएस शिक्षणासाठी (MBBS Teaching) कर्नाटकातील हुबळीला दोन वर्षांपूर्वी पाठविले. वडील प्रेमसिंग गोपू नाईक यांनी नीरजला डॉक्‍टर होण्याचे स्वप्न (The dream of becoming a doctor) पाहिले होते. मात्र, ते पूर्ण होण्याआधीच व्हेंटिलेटरअभावी (Ventilator) पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी प्राण सोडले. वडील ‘सिरीयस’ आहेत, असा निरोप मिळताच नीरज हुबळीवरून दुचाकीने ६७० किलोमीटर अंतर रात्रीतून कापत १२ तासांत पुसदला पोहोचला. परंतु, वडिलांच्या पार्थिवाचेच दर्शन घेण्याचा दुर्दैवी प्रसंग त्याच्यावर ओढवला. (The childs journey of 670 km to see the father yavatmal news)

नीरजचे वडील प्रेमसिंग नाईक (वय ४९) हे मूळ कर्नाटकातील बिजापूरचे रहिवासी. उदरनिर्वाहासाठी ते २५ वर्षांपासून पुसद येथे स्थायिक झालेत. सुरुवातीला ते बंजारा कॉलनीत राहत. पुसद पंचायत समितीसमोर त्यांची चहाची कॅन्टीन होती. आई नीमा मोलमजुरी करून संसाराला हातभार लावत होती. त्यांना नीरज हा मुलगा व निर्जला मुलगी. दोघेही अभ्यासात हुशार.

वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास
नागपूरकरांची दाणादाण : वादळी पावसाने उपराजधानीला झोडपले

निरजला दोन वर्षांपूर्वी नीट परीक्षेत ४७० गुण मिळाले व कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (हुबळी) येथे एमबीबीएससाठी प्रवेश निश्‍चित झाला. चहाविक्रेत्याचा मुलगा डॉक्‍टर होत असल्याने समाजातील दात्यांनी त्याच्या प्रवेशासाठी आर्थिक मदत केली. तो आता एमबीबीएस द्वितीय वर्षाला आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्याचा मानस होता. मात्र, कोविडच्या महामारीत त्याच्या वडिलांचा पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

त्याच्या वडिलाला व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकले नाही. मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत असताना तो वडिलांना वाचवू शकला नाही, याचे शल्य नीरजला आहे. त्याचे वडील प्रेमसिंग यांची ऑक्‍सिजन पातळी घसरल्याने श्वास थांबला. त्यापूर्वी त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले व ते बरेही झालेत. त्यांच्या कोविडच्या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्यात. त्यांचा मृत्यू ‘रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’मुळे झाल्याचे डॉक्‍टरांनी निदान केले. घराचा सांभाळ करणारे वडील अचानक गेल्याने नीरज व कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून, पुढील शिक्षणाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे.

वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास
मोठी बातमी : तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करूण अंत

नागरिकांनीच दिला मदतीचा हात

आर्थिकस्थिती अतिशय बिकट असल्याने अंत्यसंस्कारासाठी बंजारा कॉलनीतील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. नीरजची बहीण दहावीला असून, त्याच्या पुढील शिक्षणाच्या खर्चासाठी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दोन वर्षांपासून निरजचे वडील श्रीरामपुरातील पेट्रोल पंपाजवळ फळविक्रीचा व्यवसाय करीत होते. लॉकडाउनच्या काळात नीरज आता फळविक्रीचा व्यवसाय सांभाळत आहे.

(The childs journey of 670 km to see the father yavatmal news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com