
Nagapur News : चिमुकलीने मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातली अन्….
नागपूरात मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमधील सक्करदरा परीसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत मुलीचे नाव आहे.
खेळत असताना रिद्धीच्या हाती मच्छर मारण्याच्या औषधीची बाटली तोंडात घातल्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. तासाभराने तिची आई बेडरुममध्ये आल्यानंतर त्यांनी हा प्रकार पहिला त्यानंतर वडिलांनी रिद्धीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तासांनंतर मुलीचा मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
रिद्धी ही लहान मुलगी रविवारी दुपारी साडेबारा वाजता बेडरुममध्ये खेळत होती. तिच्या हाती मच्छर मारण्याच्या औषधीची बाटली लागली. तिने तोंडात घातल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तासाभराने तिची आई बेडरुममध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्या वडिलांनी रिद्धीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तासांनंतर मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.