Washim News : पावसाने दिली दडी.. ७ एकरातील सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर, तिबार पेरणीनंतर बापलेक शेतकऱ्यांचा निर्णय

तिबार पेरणीनंतर बापलेक शेतकऱ्यांचा निर्णय
rolling tractor
rolling tractor sakal

Washim agriculture : यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी पाऊस कमी आल्याने पेरणी केलेले बियाणे उगवले नाही आणि त्यानंतर मुसळधार पाऊस बरसल्याने पेरणी केलेले बियाणे दडपले परिणामी कारंजा तालुक्यात काहींना दुबार तर काही शेतकऱ्याना तिबार पेरणी करावी लागली.

असे असताना तिबार पेरणी केलेल्या सोयाबीनवर अळीने आक्रमण केल्याने सोयाबीनच्या पानाची अक्षरशः चाळणी झाली. त्यामुळे उत्पन्नात घट येणार या भीतीने ७ एकरातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर चालविण्यात आला. हा प्रकार कारंजा तालुक्यातील बाबापूर शिवारात घडला.

rolling tractor
Vitamin H च्या कमतरतेमुळे शरीरात उरणार नाही एनर्जी, ही लक्षण दिसताच घ्या योग्य आहार

कामरगावच्या बाबापुर शिवारात शेत येत असलेल्या प्रवीण कावरे व ज्ञानेश्वर कावरे या बापलेक शेतकऱ्याने यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची लागवड केली होती. सुरवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली असताना शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याची वेळ आली. असे असताना कसेतरी पीक शेतात डोलत असताना शेतकऱ्यांची मशागत करून डवरणी खुरपणीची कामे पूर्ण केली.

rolling tractor
K Chandrasekhar Rao : 'दलितांनी किती वर्षे संघर्ष करायचा? बराक ओबामाला अध्यक्ष करून त्यांनी पापक्षालन केलं'

आता पुढे या सोयाबीनला चांगल्या शेंगा लागून भरपूर उत्पादन पदरी पडेल या आशेवर शेतकरी असताना मागील काही दिवसात अचानकपणे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनच्या झाडाच्या पानाची पूर्ण चाळणी झाली असल्याने निराश होऊन बापलेक शेतकऱ्याने ७ एकरावरील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर फिरवून सोयाबीनचे पीक नष्ट केल्याचा प्रकार कामरगावच्या बाबापूर शेत शिवारात घडला.

rolling tractor
Nashik ZP School: जि. प. तील शिक्षकांच्या रिक्त पदांवर D. Ed., D. T. Ed. धारकांना मानधनावर घ्या

त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या बापलेक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचा डोंगर कोसळला आहे. अशा परिस्थितीत मायबाप सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांतून केल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com