

Dream Takes Flight: Aakanksha Steps into the Global Data Analytics Arena
Sakal
दिग्रस : जिद्द, मेहनत आणि आधुनिक ज्ञानाची आस असली की स्वप्नांनाही पंख फुटतात, याचे जिवंत उदाहरण म्हणजे दिग्रस येथील आकांक्षा आनंद पडगिलवार. प्रतिष्टीत बिल्डर आनंद पडगिलवार यांची कन्या असलेल्या आकांक्षाला अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास येथे मास्टर इन अॅडव्हान्स डेटा अॅनालिटिक्स या उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याने तिच्या आयुष्याने नवे वळण घेतले आहे.