

Lakhani Shocker: Bag Found with Newborn Baby Inside, Police Begin Probe
Sakal
लाखनी : तालुक्यातील मानेगाव /सडक येथे शेतशिवारातील नाल्याजवळ ८-१० दिवसाचे नवजात (स्त्री जातीचे) बाळ काळ्या बॅगमध्ये आढळले. ही घटना आज, मंगळवारी दुपारी उघडकीस आली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे बाळ जिवंत असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास लाखनी पोलिस करीत आहेत.