Abhijit Dipke : सरकारची पाच हजारांची मदत तुटपुंजी ,अभिजित दीपके , आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद

Drought-Hit Farmers: अमरावतीतील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत अभिजित दीपके यांनी शेतकरी कुटुंबांची भेट घेतली; पाच हजारांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित करत सरकारकडे ठोस मदतीची मागणी केली.
Abhijit Dipke meets the family of farmer Sandeep Karde in Savanga Gurav during his visit to drought-affected areas of Amravati district.

Abhijit Dipke meets the family of farmer Sandeep Karde in Savanga Gurav during his visit to drought-affected areas of Amravati district.

esakal

Updated on: 

अमरावती,: राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत असताना शासन- प्रशासनाचे मात्र त्यांच्याकडे लक्षच नसल्याचे दिसून येत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच हजारांची मदत जाहीर तर केली, मात्र एवढ्या तुटपुंज्या रकमेत काय होणार? दुष्काळी स्थितीत पुढे शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार? याचे उत्तरच सरकारने दिलेले नाही. केवळ तुटपुंजी मदत जाहीर करून सरकार शांत बसले आहे, असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांनी शनिवारी (ता.२८) केला.

Loading content, please wait...