Abhijit Dipke interacts with drought-affected farmers during the ‘Public Kya Bolti’ campaign in Kalamb, Yavatmal.
esakal
कळंब : शेतकऱ्यांच्या मतदानावर सत्तेची खुर्ची मिळवायची, संकटाच्या काळात त्यांच्याकडे पाठ फिरवायची, ही सरकारची भूमिका योग्य नाही, अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते शुक्रवारी (ता. २७) शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पक्षाने सुरू केलेल्या ‘पब्लिक क्या बोलती’ या अभियानांतर्गत कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते.