मटणाच्या हिस्याप्रमाणे त्याच्या वाट्याला आली २२ लाख २४ हजारांची रक्कम; मात्र, नशिबाने दिली नाही साथ

Accused recovered ransom from Gujarat traders Nagpur cirme news
Accused recovered ransom from Gujarat traders Nagpur cirme news

नागपूर : गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करून लाखो रुपयांची खंडणी वसूललेल्या टोळीच्या एका सदस्याला बेलतरोडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पोलिसांनी खंडणी वसूलल्यानंतर त्याच्या वाट्याला आलेली २२ लाख २४ हजारांची रक्कम जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज नंदकिशारे यास (वय ३४, रा. रामगढ, सिक्कर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून १९ जानेवारीला गुजरात राज्यातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली होती. त्यानंतर आरोपींनी पैशांची आपापसात वाटणी करून ते देशाच्या विविध भागात पसार झाले होते.

मनोज हा हरियाणा येथून बेंगळुरूसाठी (एचआर-०२, एई-५०२८) क्रमांकाच्या कारने जात असल्याची गोपनीय माहिती गुजरात पोलिसांना मिळाली. गुजरात पोलिस त्याच्या मागावर होते. पण त्याच्यापर्यंत पोहोचायला उशीर असल्याने त्यांनी नागपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी पांजरी पथकर नाका परिसरात नाकेबंदी केली व प्रत्येक वाहनांची चौकशी करीत होते. त्यावेळी संशयित कारमध्ये आरोपी दिसला.

बेलतरोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक तेजराम देवळे, गोपाल देशमुख, बजरंग जुनघरे, प्रशांत सोनुलकर, राकेश रुद्रकार आणि मनोज शाहू यांनी त्याची चौकशी केली. तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कारमध्ये पाचशे व दोन हजारांच्या चलनी नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या. त्यांची किंमत २२ लाख २४ हजार ५०० रुपये होती.

पोलिसांनी पैशासंदर्भात माहिती विचारली असता त्याने आपण व्यापाऱ्याच्या अपहरण केले होते व त्याच्या वाटणीत मिळालेले पैसे असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून रोख रकमेसह चार मोबाईल व इतर दस्तावेज जप्त केले. त्यानंतर आरोपीला गुजरातच्या गांधीधाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com