Nagpur : अनिल देशमुखांवर राजकीय द्वेषातून कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh
अनिल देशमुखांवर राजकीय व्देशातून कारवाई

अनिल देशमुखांवर राजकीय द्वेषातून कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुडबुध्दीने आणि राजकीय व्देशातूनच कारवाई करण्यात आली. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला धोटे यांनी गुरूवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परीषदेत केला. पोलिस महासंचालक परमवीर सिंह आणि नागपूरचे पोलिस आयुक्त अतिमेश कुमार राज्य सरकारमध्ये कार्यरत राहून केंद्राच्या ईशाऱ्यावर काम करतात. त्या दोघांचेही दुरध्वनी आणि भ्रमणध्वनींचा सीडीआर तपासल्यास सत्य बाहेर येईल, असा आरोप करीत ज्वाला धोटे म्हणाल्या. पोलिस आयुक्तांनी वारांगनावरसुध्दा अन्याय केला असून त्यांचे सामाजिक अधिकार हिरावले.

तृतियपंथीयांनाही ते सापत्न वागणूक देतात. अलिकडेच एका आदीवासी महिलेवर अत्याचार झाला. मात्र, त्याची तक्रारसुध्दा घेतली नाही. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आदिवासी महिलेच्या प्रकरणात त्यांच्यावर अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या. शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी नागपूरला नवीन पोलिस आयुक्त देण्याची मागणी त्यांनी केली.

हे संपूर्ण प्रकरण मुख्यमत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले. बनावट स्टॅम्प बनविणारे रॅकेट ठाणे येथे बनावट स्टॅंप घोटाळा झाला होता. त्या स्कॅममध्ये परमवीर सिंह यांचा हात होता. त्याच धर्तीवर नागपुरात आजही बनावट स्टॅंप बनविणारे रॅकेट सुरू असून याची पुरेपूर माहिती पोलिस आयुक्तांना आहे. महिनाभरापूर्वीच एका महिलेला जुने स्टॅंपविक्री करताना सदर पोलिसांनी अटक केली होती, असे ॲड. सतीश उके यांनी सांगितले.

नागपूर पोलिसांवर केलेले आरोप तत्थहिन आणि निराधार आहेत. यावर प्रतिक्रिया देण्याचीही इच्छा नाही. नागपूर पोलिस योग्यरित्या कायदेशीर मार्गाने कारवाई करीत आहे.

- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, नागपूर शहर.

loading image
go to top