नागपूर : बुलडोजरने केली ३३ दुकाने भुईसपाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकानांच्या अतिक्रमणावर कारवाई केली.

नागपूर : बुलडोजरने केली ३३ दुकाने भुईसपाट

नागपूर - गेल्या अनेक वर्षांपासून सीताबर्डी मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानांच्या अतिक्रमणावर नागपूर सुधार प्रन्यासने आज बुलडोजर चालवला. यातील काही दुकानदार न्यायालयात गेले होते. परंतु, न्यायालयाने कारवाई योग्य ठरविली. अखेर आज सकाळी नऊ वाजतापासून नासुप्रने दुकाने तोडण्याची कारवाई केली. यात जवळपास ३३ दुकाने भूर्ईसपाट करण्यात आली. सीताबर्डी येथे ग्लोकल मॉल तयार करण्यात येत आहे. ही सर्व जागा बुटी यांची आहे. येथील दुकानदार यापूर्वीही न्यायालयात गेले होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. सीताबर्डी मेन रोडवर अनेकांनी पक्के बांधकाम करून दुकाने थाटले होते. नासुप्रच्या कारवाईविरोधात येथील दुकानदार १ मे रोजी न्यायालयात गेले होते. परंतु, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. आज सकाळी नासुप्रचे पथक दुकाने तोडण्यासाठी आले. त्यावेळी दुकानदारांनी विरोध करण्याच्या प्रयत्न केला. मोठा पोलिस बंदोबस्तामुळे व त्यांना माघार घ्यावी लागली. चार जेसीपीच्या सहाय्याने येथील दुकाने तोडण्यास सुरुवात करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.

अवघ्या तीन तासांत येथील दुकाने तोडल्यानंतर अभ्यंकर रोडवरील अतिक्रमण तोडण्यात आले. त्यामुळे सर्वत्र टिनाचे शेड, तुटलेल्या भिंतीचा मलबा दिसून येत आहे. हा मलबा उद्या हटविण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सीताबर्डी मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून आता हा रस्ता नागरिकांसाठी मोकळा झाला.

सीताबर्डीचा बदलला लूक

नासुप्रच्या कारवाईमुळे सीताबर्डी मुख्य रस्ता आता रुंद झाला असून ग्लोकल मॉल दिसून येत आहे. मेट्रो रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या या मॉलमुळे सीताबर्डीचे चित्र बदलणार आहे तर कारवाईमुळे मुख्य रस्त्याचा लूकच बदलला.

Web Title: Action Taken Against Thirty Three Shop Encroachers Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top