esakal | वंचितांच्या हक्कासाठी लढा देणारा 'कार्यकर्ता' काळाच्या पडद्याआड; 'कोर्ट'चे नायक वीरा साथीदारांचं निधन 

बोलून बातमी शोधा

वीरा साथीदार यांनी 'कोर्ट‘ सिनेमात नारायण कांबळेच्या या लोकशाहीराच्या भूमिकेतून आवाज बुलंद केला. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कारासहित वीराच्या दमदार अभिनयाच्या बळावर तब्बल १८ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाने पटकाव

वीरा साथीदार यांनी 'कोर्ट‘ सिनेमात नारायण कांबळेच्या या लोकशाहीराच्या भूमिकेतून आवाज बुलंद केला. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कारासहित वीराच्या दमदार अभिनयाच्या बळावर तब्बल १८ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाने पटकाविले होते.

वंचितांच्या हक्कासाठी लढा देणारा 'कार्यकर्ता' काळाच्या पडद्याआड; 'कोर्ट'चे नायक वीरा साथीदारांचं निधन 
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या दक्षिण नागपुरातील जोगीनगर वस्तीतील क्रांतीकारी लोकशाहीर, गीतकार आणि तळागाळातील वंचितांच्या हक्कासाठी लढा उभारणारा कार्यकर्ता तसेच ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘कोर्ट’ सिनेमाचे नायक वीरा साथीदार (विजय वैरागडे) यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाने विळख्यात घेतले होते. आठ दिवसांच्या झुंजीनंतर त्यांची आज मंगळवारी पहाटे प्राणज्योत मालवली.

वीरा साथीदार यांनी 'कोर्ट‘ सिनेमात नारायण कांबळेच्या या लोकशाहीराच्या भूमिकेतून आवाज बुलंद केला. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कारासहित वीराच्या दमदार अभिनयाच्या बळावर तब्बल १८ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार या सिनेमाने पटकाविले होते. नागपुरातील सिनेमाच्या माध्यमातून एक दमदार अभिनेत्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

बापरे! उपराजधानीतील रामदासपेठेत कोरोनाचे संशयित बॉम्ब? पॅथॉलॉजी सेंटरमध्ये गर्दीच गर्दी!

वीरा साथीदार मुळचे बुटीबोरी जवळ असलेल्या परसोडीतील. या गावात असताना गुरे चारण्याचे काम वीरा यांनी केले. यानंतर हे कुटंब नागपुरातील जोगीनगर येथे स्थायिक झाले. वीराचे वडिल नागपूरच्या रेल्वेस्थानकावर कुली होते. आई बांधकाम मजूर. मात्र बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या दाम्पत्याने वीरा यांना आईवडिलांनी शिकविले. मात्र घरची परिस्थती हलाखीची असल्याने एमआयडीसीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. नागपूरच्या एका दैनिकात वार्ताहर म्हणून काम केले. पुढे बांधकाम मजूर म्हणूनही काम केले. 

यादरम्याम त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी मोठा संघर्ष करण्यास सुरुवात केली. चळवळीतील कार्यकर्ता म्हणून पुढे आले."विद्रोही‘ नावाच्या मासिकाचे संपादनही त्यांनी केले. "रिपब्लिकन पॅंथर‘ संघटनेच्या माध्यमातून वंचितांसाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता जगण्या-मरण्याच्या संघर्षात प्रस्थापित व्यवस्थेचे दाहक चटके सोसणारा आणि यानंतर व्यवस्थेविरुद्ध उभा ठाकणारा वीरा यांनी कॉम्रेड याचा अर्थ साथीदार हे नाव धारण केले. नुकतेच त्यांनी 'बाबा' या चित्रपटातूनही भूमिका केली तसेच त्यांची 'आधा चांद तुम रख लो' या चित्रपटातील भूमिकाही प्रचंड गाजली. ॲड. राठोड, मुकुंद अडेवार, दीनानाथ वाघमारे, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वहाणे, रिपाईचे प्रकाश कुंभे, रिपाई आठवले गटाचे राजन वाघमारे यांच्यासह अनेक संघटनांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

ही तर अक्षरशः लूटमार! खासगी सिटी स्कॅन केंद्रांवर रुग्णांची लूट; मेडिकलमध्ये मात्र मोफत

वीरा साथीदार म्हणत होते…

’कार्यकर्ता म्हणून जगणं हे जास्त महत्वाचं आहे’, यामुळेच कोर्टमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपास आल्यानंतर सिनेसृष्टीत रमण्यापेक्षा अभिनेता म्हणवून न घेता स्वतःला चित्रसृष्टीपासून दूर ठेवत स्वतःचे आयुष्य सोडून इतरांचे आयुष्य ‘सोनेरी’ करण्याचे भान वीरा साथीदार यांनी राखले, अशी शोकसंवेदना अभिनव कला निकेतनचे दादाकांत धनविजय यांनी व्यक्त केली. 

संपादन - अथर्व महांकाळ