
नागपूर - कला क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र, संघर्षाशिवाय या क्षेत्रात यश प्राप्त होत नाही. कला ही तपस्या असून संघर्ष आणि तपस्येतून कलाकार घडतो, असे प्रतिपादन महाभारतातील युधिष्ठिराची भूमिका साकारणारे अभिनेते आणि भारतीय फिल्म और टेलीविजन संस्थेचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी केले.