भगवान राम बांधणार बाधितांसाठी पूल! अभिनेता गुरमित उभारणार कोविड हॉस्पिटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगवान ‘राम’ बांधणार बाधितांसाठी पूल! अभिनेता गुरमित उभारणार कोविड हॉस्पिटल

भगवान ‘राम’ बांधणार बाधितांसाठी पूल! अभिनेता गुरमित उभारणार कोविड हॉस्पिटल

नागपूर : कोविडविरोधातील (coronavirus) लढा यशस्वी करण्यासाठी कोविड केअर सेंटरची (Covid Care Center) आवश्यकता आहे. त्यासाठी एच बी टाऊन, पारडी येथे मेकशिफ्ट कोविड केअर हॉस्पिटल सुरू केले आहे, असे ट्वीट अभिनेता गुरमित चौधरी (Actor Gurmeet Chaudhary) यांनी केले आहे. लवकरच जास्त बेड आणि सुविधा मिळतील असे आणखी काही कोविड केंद्र उपराजधानीत उभारायचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. (Actor Gurmeet to build Kovid Hospital)

गुरमित यांनी टीव्हीवर २००८ मध्ये रामायण मालिकेत रामाची भूमिका केला होती. त्यांनतर त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या कामाची ढाप उमटवली आहे. सध्या देशातील काही भागात वैद्यकीय सोयी सुविधांअभावी कोरोनाबाधितांची अतिशय वाईट अवस्था आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनसह इतर बाबींचाही तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा: Success Story : तिखट मिरचीने केला ६० जणांचा संसार गोड; कोरोना काळातही बारमाही काम

अशावेळी सामाजिक कर्तव्य व जबाबदारी म्हणून गुरमित यांनी प्रत्यक्ष मदतीला प्रारंभ केला आहे. पाटना येथे त्यांनी नुकतीच एक हजार बेडची सुविधा असलेले कोविड केंद्र सुरू केले आहे. त्यापाठोपाठ संत्रानगरीत वाढलेला कोविड संसर्ग लक्षात घेता त्यांनी येथेही कोविड केंद्र उभारायचे ठरविले. डॉ. सय्यद वजाहतअली आणि टीमच्या सहकार्याने त्यांनी नागपुरात एक समर्पित मेकशिफ्ट कोविड केअर हॉस्पिटल सुरू केले आहे.

‘मदतीसाठी आमच्यापर्यंत पोहोचा‘

रुग्णालयाची छायाचित्रे पोस्ट करीत त्यांनी लिहिले की नागपूर आणि आसपासच्या लोकांना मदत करण्यासाठी आम्हाला अशा आणखी केंद्रांची आवश्यकता आहे. कृपया कोणत्याही मदतीसाठी आमच्यापर्यंत पोहोचा.

(Actor Gurmeet to build Kovid Hospital)

Web Title: Actor Gurmeet To Build Kovid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top