esakal | अकरावी प्रवेश नोंदणीची तारीख ठरली, केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

registration for class 11 soon

अकरावी प्रवेश नोंदणीची तारीख ठरली, केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीच्या प्रवेशासाठी (eleventh class admission) केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येतात. मात्र, यंदा अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटीचे (CET for eleventh) आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यावर शिक्षण मंडळाचा भर असल्याने त्यासाठी १ ऑगस्टपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, तंत्रनिकेतनची नोंदणी अगोदरच सुरू झाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. (admission for eleventh class start from 1 august)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

शहरात अकरावीच्या ५९ हजार २५० जागांचा समावेश आहे. त्यापैकी गेल्यावर्षी २४ हजार ४१६ जागा रिक्त राहिल्या होत्या. केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीसह ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' फेरी घेण्यात आली. त्यानंतरही रिक्त जागांची संख्या जास्त असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रोष निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर करण्यात आले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासक्रमावर फोकस केले, त्यांना याचा फटका बसला. मात्र, नववीमध्ये अधिक गुण असलेल्यांना लॉटरी लागली. त्यातून जे द्वितीय श्रेणीत होते. तेही प्रथम आणि प्राविण्यात आलेत. विभागात याची संख्या १ लाख २५ हजार ९२१ इतकी आहे. त्यामुळे याचा फायदा यावर्षी अकरावी प्रवेशात कनिष्ठ महाविद्यालयांना मिळणार आहे.

एकूण जागा - ५९,२५०

  • कला - ९,६६० - रिक्त जागा - ५,६४०

  • वाणिज्य - १७,९२० - रिक्त जागा - ७,९५३

  • विज्ञान - २७,३३० - रिक्त जागा - ८,७१४

  • एमसीव्हीसी - ४,१३० - रिक्त जागा - २,१०९

एकूण रिक्त जागा - २४,४१६

loading image