esakal | यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान
sakal

बोलून बातमी शोधा

यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळंब (जि. यवतमाळ) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महापूजेत सहभागी होण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील कन्येला मिळाला आहे. ती या महापूजेत पतीसह सहभागी होणार आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक महापूजा करीत असतात. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक विठ्ठलाची शासकीय पूजा करणार आहे. मंगळवारी (ता. २०) दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी ही महापूजा होणार आहे. (Ashadi-Ekadashi-Pandharpur-Respect-for-Mahapuja-Girl-from-Yavatmal-district-nad86)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पूजेच्या वेळी मानाचा वारकरी म्हणून श्री चिंतामणी कळंब येथील सुकन्या इंदूबाई केशवराव कोलते व पती केशवराव शिवदास कोलते (रा. वर्धा) उपस्थित राहणार आहेत. कोलते यांची विठ्ठल मंदिर कमिटीने पूजेसाठी निवड केली आहे. कळंब येथील पोळा मारुती परिसरात राहत असणारे चंदू कामडी यांची इंदूबाई कोलते ही बहीण असून, कळंबनगरीची कन्या आहे. तिचे सासर वर्धा आहे. संत तुकाराम मठ नवनाथ मंदिराचे मागे त्यांचे घर आहे.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

केशवराव कोलते व पत्नी इंदूबाई यांना तरुण वयापासूनच विठ्ठल हरी नामाची आवड आहे. दोघेही वारकरी संप्रदायाचे भक्त आहेत. केशवराव कोलते हे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात चोवीस तास पहारा देणारे विणेकरी आहेत. मंदिरात पहारा देणाऱ्या आठ विणेकऱ्यांपैकी दोन विणेकरी यांना मागील वर्षीच्या आषाढीला पूजेची संधी मिळाली होती. शिवाय चार विणेकऱ्यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्यामुळे केशवराव शिवरकर व बापू सावजी मुळीक या दोन विणेकऱ्यांपैकी ईश्‍वर चिठ्ठीने केशवराव कोलते यांची निवड झाली आहे. याबद्दल कळंब तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे.

(Ashadi-Ekadashi-Pandharpur-Respect-for-Mahapuja-Girl-from-Yavatmal-district-nad86)

loading image