esakal | Nagpur : ग्रामीणमधील शाळा चार ऑक्टोबरपासून
sakal

बोलून बातमी शोधा

school

Nagpur : ग्रामीणमधील शाळा चार ऑक्टोबरपासून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचे रुग्ण जवळपास शून्यावर आल्याने आणि तिसरी लाट येण्याचे संकेत नसल्याने ग्रामीण भागातही येत्या चार ऑक्टोंबरपासून मुलांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. यासंदर्भात लवकरच आदेश जारी केल्या जाणार असल्याने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग कामाला लागला आहे.

राज्याच्या टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. नागपूर जिल्ह्यात शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार ६५० शाळा सुरू होऊ शकतात. शासनाने २४ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठविला आहे. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली आहे. त्यांनी शाळा करण्यास हिरवा कंदील दिला. बैठकीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात येणार आहे. उद्या जिल्हाधिकारी विमला आर. यांची आदेशावर सही होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

मार्गदर्शक सूचना

  • कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करणे.

  • समितीच्या ठरावाद्वारे शाळा सुरू करणे.

  • प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करावे

  • शाळा सुरू करण्यापूर्वी १ महिना संबंधित गावात कोरोना रुग्ण नसावा.

  • शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे.

  • कोरोनाग्रस्त विद्यार्थी आढळल्यास तत्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कारवाई मुख्याध्यापकांनी करावी.

  • गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देवू नये.

loading image
go to top