Success Story : रौनकच्या जिद्दीला यशाचे पंख; संकटांशी झुंजताना ‘सीए’ होण्याचे स्वप्न अजून दूरच
HSC Result : पित्याच्या मृत्यूनंतर आईच्या शिवणकामावर घर चालवणाऱ्या रौनक परातेने १२वी वाणिज्य शाखेत ९२.३३% गुण मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली. ‘सीए’ होण्याचे स्वप्न अजून दूर असले तरी त्याची वाटचाल निश्चित प्रेरणादायक आहे.
नागपूर : पाचपावलीतील ठक्करग्राम वसाहतीत राहणाऱ्या रौनक पराते याने बारावीच्या वाणिज्य शाखेत तब्बल ९२.३३ टक्के गुण मिळवत यशस्वी उड्डाण घेतले आहे. पण, या यशामागे आहे संघर्षाची कहाणी.