
शेतीचा वाद उठला भावजईच्या जीवावर; चाकूचा वार थोडक्यात हुकला
उमरखेड : लहान भाऊ दोन वर्षांपूर्वी वारला. मात्र, त्याच्या नावावर असलेली दोघां भावांची १४ एकर शेती पूर्ण हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावाने चक्क लहानभावाच्या बायकोवर चाकूहल्ला घडविला. ही घटना रविवारी (ता. ६) सायंकाळी घडली. यातील मुख्य आरोपीला बिटरगाव पोलिसांनी अटक केली असून अन्य फरार आरोपींचा शोध घेतला जात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढाणकी येथील कनिज फातिमाबी शे. अजहर (वय ३२) हिचे पती शे. अजहर यांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. शेख अजहर व त्याचा भाऊ सरफराज खान (वय २०) या दोघांच्या नावाने १४ एकर शेती आहे. मृत अजहरच्या हिस्स्याची शेती हडपण्याचा प्रयत्न मोठ्या भावाने, सरफराजने सुरू केला.
त्यातूनच अजहरची पत्नी कनिज फातिमाबी ही अजहरच्या हिस्स्यातील शेतीतून हरभरा काढत असताना पाच-सहा व्यक्तींना सोबत घेऊन सरफराज तेथे आला व त्याने फातिमाबीवर चाकूने वार केला. चाकू हा कनिज फतीमा हिने हातावर अडविल्याने अनर्थ टळला.
यावेळी आरोपीसोबत असलेल्या पाच ते सहा व्यक्तींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी सरफराज खान याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रताप बोस यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
''या घटनेत आरोपीने फिर्यादीला ज्या हत्याराने जखमी केले तो सुरा मिळाला असून आरोपीला अटक केली आहे. तो पुसद येथील वसंतनगर परिसरातील अट्टल गुन्हेगार आहे.''
- प्रताप बोस, ठाणेदार, बिटरगाव ठाणे.
Web Title: Agriculture Land Dispute Brother Wife Knife Attack
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..