

Union Minister Nitin Gadkari highlights water conservation, drought management and modern farming at the Agrovision 2026 planning meeting in Nagpur.
esakal
नागपूर,: विदर्भातील शेतकऱ्यांचे मनोबल उंचावून दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवर्धन, पाण्याचे काटेकोर नियोजन आणि योग्य पीक पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री आणि ॲग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
१७ वे ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शन २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आयोजित केले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आयोजित उच्चस्तरीय आयोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.