Ahmednagar: रस्त्याच्या कामांना आचारसंहितेचा अडथळा ? अहमदनगरमधील या रस्त्यांची काम अजूनही अर्धवटच

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेला दोन वर्षात तब्बल शंभर कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला. परंतु निविदांच्या घोळात ही कामे रखडली. आता या रस्त्यांच्या कामावर आचारसंहितेची टांगती तलवार आहे.
Ahmednagar: रस्त्याच्या कामांना आचारसंहितेचा अडथळा ? अहमदनगरमधील या रस्त्यांची काम अजूनही अर्धवटच

Ahmednagar Development Work: शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेला दोन वर्षात तब्बल शंभर कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी मंजूर झाला. परंतु निविदांच्या घोळात ही कामे रखडली. आता या रस्त्यांच्या कामावर आचारसंहितेची टांगती तलवार आहे.

शहर व उपनगरातील १७ प्रभागांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. काही पक्ष व सामाजिक संघटनांनी प्रशासनाला निवेदने देवून खड्ड्यांबाबत जाब विचारला, काही आंदोलनेही केली.

परंतू महापालिकेच्या ढिम्म प्रशासनाला जाग आलेली नाही. वारंवार भुयारी गटारचे काम आणि पावसाचे कारण पुढे केले करण्यात आले. केवळ खोटी आश्वासने देवून वेळ मारून नेण्याचे काम अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रसत्यांच्या कामाला वेळेत मंजुरी मिळाली नाही, तर ही कामे पुन्हा लांबणीवर पडणार आहेत.(Latest Marathi News)

या प्रमुख रस्त्यांची कामे रखडली

गुलमोहर रस्ता

अमरधाम ते जुना टिळक रस्ता

गंगा उद्यान ते झोपडी कॅन्टीन

प्रेमदान ते प्रोफेसर चौक

अप्पू हत्ती ते डीएसपी चौक

दिल्लीगेट ते जुने कोर्ट

इतर सर्वच अंतर्गत रस्ते

वाढीव दराचा नवा ट्रेंड

Ahmednagar: रस्त्याच्या कामांना आचारसंहितेचा अडथळा ? अहमदनगरमधील या रस्त्यांची काम अजूनही अर्धवटच
Ashok Chavan: फक्त काँग्रेसचाच नाही तर अशोक चव्हाणांचा आमदारकीचाही राजीनामा? व्हायरल पत्रातून झालं स्पष्ट

रस्त्यांच्या कामासाठी शासनाने दोन वर्षात मंजूर केलेला १०८ कोटी रूपयांचा निधी अद्याप खर्च करता आलेला नाही. ‘अर्थ’पूर्ण कारणांमुळे निविदा प्रक्रियेचा घोळ तयार झाला. या घोळात संबंधित कामे लांबणीर पडली आहेत. काही कामे करण्यास ठेकेदार नकार देत आहेत. त्यामुळे वाढीव दराने निविदा मंजूर करण्याचा नवा ट्रेंड महापालिकेत सुरू झालेला आहे. (Latest Marathi News)

नगरमधील रस्त्यांची सध्याची परिस्थिती वर्णन न करण्यासारखी आहे. या परिस्थितीला जनतेचे प्रतिनिधीच जबाबदार आहेत. बालिकाश्रम, कोठी व केडगाव देवी या रस्त्यांप्रमाणे कामे पुन्हा झाली नाहीत, हे नगरकरांचे दुर्दैव आहे.

- एन. डी. कुलकर्णी,निवृत्त शहर अभियंता, महापालिका

Ahmednagar: रस्त्याच्या कामांना आचारसंहितेचा अडथळा ? अहमदनगरमधील या रस्त्यांची काम अजूनही अर्धवटच
Ashok Chavan: फक्त काँग्रेसचाच नाही तर अशोक चव्हाणांचा आमदारकीचाही राजीनामा? व्हायरल पत्रातून झालं स्पष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com