

AI generated fake NIA ID arrest in Nagpur
sakal
नागपूर : एनआयएचा अधिकारी असल्याचे सांगून धमकी देणाऱ्या प्रल्हाद दिलीपकुमार सिन्हा (वय २५, रा. सातगाव, बुटीबोरी) या तोतया अधिकाऱ्याने बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी ‘एआय’चा वापर केल्याची माहिती तपासात समोर आली आली आहे. गुन्हेशाखेच्या पथकाने त्याला अटक केल्यावर यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला न्यायालयात सादर केले असता, त्याची २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.