Nagpur News : आजारी पतीचा शेवटचा निर्णय ‘दुपट्टा’ बनला मृत्यूचा साक्षीदार! कामठीत गळफास लावून संपवले जीवन
Mental Health Awareness : कामठीतील खलाशी लाईन येथे आजाराने त्रस्त असलेल्या ४९ वर्षीय इसमाने गळफास लावून जीवन संपवले . महानगरपालिकेच्या कंत्राटी नोकरीत कार्यरत असलेल्या खोब्रागडे यांच्या या पावलामुळे परिसरात हळहळ.
कामठीः न्यू खलाशी लाईन येथे आजाराला त्रस्त झालेल्या इसमाने राहत्या घरी दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२७)सायंकाळी पाचच्या सुमारास घडली असून विलास लक्ष्मण खोब्रागडे (वय ४९, खलाशी लाईन, कामठी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.