हवाई प्रवास महागला; शुल्कात ४० टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

air travel is expensive all airlines including air india hiked ticket prices by 40 percent nagpur
हवाई प्रवास महागला; शुल्कात ४० टक्के वाढ

हवाई प्रवास महागला; शुल्कात ४० टक्के वाढ

नागपूर : देशांतर्गत विमानांच्या तिकीटामध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ झालेली आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान, दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आतंरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना काळात देशाबाहेरील विमान उड्डाणासाठी अनेक बंधने घालण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महाग झाला होता.

कोरोनाचा काळ संपून सण-उत्सवाला सुरवात झाल्यानंतर विमान कंपन्यांची मनमानी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नागपूरहून उड्डाण करणाऱ्या जवळपास सर्वच विमान कंपन्यांची तिकिटे ३० ते ४० टक्क्यांनी महागली आहेत. जेट इंधनाच्या किमती वाढल्या असल्याने विमान तिकिटांमध्ये वाढ होत आहे. अलीकडे, बहुतेक देशांतर्गत मार्गांवर भाडे वाढले आहे. नागपूर मुंबई विमानाचे तिकीट पूर्वी ३००० रुपयात मिळत होती ती आता पाच ते साडे पाच हजार रुपयावर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून घरात बसलेले नागरिक आता पर्यटनाला जाऊ लागले आहे. उन्हाळा असल्याने देशांतर्गत पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्याचा आणि इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे विमान कंपन्यांनी त्यांच्या तिकिटांच्या किमती वाढवल्या आहेत.

दिवाळी, होळी आणि ईदच्या मुहूर्तावर विमान कंपन्या दरवेळी तिकीट दरात वाढ करतात. विमानभाड्यात वाढ होऊनही उन्हाळी हंगामासाठी प्रवासाची मागणी वाढलेली आहे. एप्रिल महिन्यात गोवा, कश्मीर, श्रीनगर, लेह लद्दाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, भारतातील पूर्वोत्तर राज्य अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि त्रिपुरा या राज्यातही जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विमानाच्या तिकींटाचे दर वाढलेले आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात इंधनाचे दर वाढले आहेत.

इंधनाच्या दरवाढीमुळे विमानाचे दरात विक्रमी भाववाढ झालेली आहे. त्यामुळे पर्यटन पॅकेजचेही दर वाढलेले आहे. पूर्वी नागपूर मुंबई विमान प्रवासासाठी साडे तीन चार हजार रुपये मोजावे लागत होते. आता त्याचे दर चार ते साडे पाच हजार रुपये झाले आहेत.

- विश्वनाथ उपाध्याय, अध्यक्ष, टुरिझम आंत्रप्रुनर्स नेटवर्क

विमान शुल्क - पूर्वी - आता

नागपूर - मुंबई - ३००० ते ४००० - ५००० ते ६०००

नागपूर - दिल्ली - ३५००- ५००० - ४५०० ते ६५००

Web Title: Air Travel Is Expensive All Airlines Including Air India Hiked Ticket Prices By 40 Percent Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top