Ajit Pawar: वेळ देत नसाल तर खुर्ची सोडा; अजित पवार :‘राष्ट्रवादी’च्या मंत्र्यांची कानउघाडणी
Maharashtra Politics: नागपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना कडक इशारा दिला. पक्षासाठी वेळ न देणाऱ्यांनी खुर्ची सोडावी, कार्यकर्त्यांशी संवाद साधावा असे स्पष्ट निर्देश दिले.
नागपूर : ‘‘आपले काही पालकमंत्री फक्त शासकीय कार्यक्रमांनाच संबंधित जिल्ह्यात उपस्थित राहतात. ज्या शहरात जातात तेथील जिल्हाध्याक्षांकडे बघतसुद्धा नाहीत, पदाधिकाऱ्यांसोबत बोलत नाहीत.