
नागपूर : सत्तेत असतानाही आमची कामे होत नाही. त्याची दखल घेतली जात नाही. मुंबई कार्यालयात दिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते असा आरोप करणाऱ्या विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी अजित पवार यांनी चांगलेच खडसावून कुणीही आपले वैयक्तिक कामे घेऊन येऊ नका असे स्पष्ट सांगितले.