Who Was Akku Yadav? नागपूरात तर कोर्टरूमध्येच २०० महिलांनी एकाला संपवलं होतं, महाराष्ट्र हादरवणारं अक्कू यादव हत्याकांड काय होतं?

Who Was Akku Yadav? The Criminal Who Terrorised Kasturba Nagar : नागपूरच्या कोर्टरूममध्ये २०० महिलांनी कुख्यात गुंड अक्कू यादवची हत्या का केली? जाणून घ्या १३ ऑगस्ट २००४ रोजी घडलेल्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम.
Akku Yadav murder case in Nagpur, where a mob of women attacked the notorious criminal inside Nagpur District Court on August 13, 2004

Akku Yadav murder case in Nagpur, where a mob of women attacked the notorious criminal inside Nagpur District Court on August 13, 2004

esakal

Updated on: 

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ वर मंदार किवळे यांच्यावर सहा जणांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. गोळीबार आणि कोयत्याने वार करत करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे न्यायालयासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्याय मिळवून देणाऱ्या न्यायालयाच्या आवारातच अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, न्यायालयाच्या परिसरात घडलेली ही पहिलीच धक्कादायक घटना नाही. नागपूरमध्ये १३ ऑगस्ट २००४ रोजी घडलेले अक्कू यादव हत्याकांड आजही देशभरात चर्चेचा विषय ठरते. विशेष म्हणजे, या घटनेत आरोपीवर हल्ला करणारे दुसरे गुन्हेगार नव्हते, तर त्याच्या अत्याचारांना कंटाळलेल्या कस्तुरबा नगरमधील शेकडो महिला होत्या. या महिलांनी न्यायालयाच्या कोर्टरूममध्येच अक्कू यादवची हत्या केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

khesarilal yadav
११ चेंडूंत ५४ धावा! सूर्यकुमार यादवचं वादळी पुनरागमन; मुशीर खानचेही अर्धशतक... मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय
'Ram vs Krishna' Conflict Before UP Elections
Aaranksha Yadav appointed Ausa SDPO