

Police personnel inspect the scene of the fatal attack on Akash Gawai in Akola.
ESakal
अकोला, : शहरात आठवडाभरात दोन हत्यांच्या घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोरक्षण मार्गावरील एमएसईबी कार्यालय परिसरात आकाश गवई या तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
सलग घडणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर घटनेनंतर नातेवाईकांकडून खदान पोलिस स्टेशनमध्ये ठिया देण्यात आला.
जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गोरक्षण मार्गावरील वीज कंपनीच्या उपकेंद्राजवळ कृषीनगर येथील रहिवासी आकाश गवई हा तरुण अंडाभुर्जीच्या गाडीवर गेला होता. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढविला.