
नागपूर : अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा मुहूर्त साधणार
नागपूर - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केल्याने बाजारात चैतन्य निर्माण झाले होते. आताही तब्बल दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रतिबंधानंतर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होईल, अशी अपेक्षा सराफ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. त्यासाठी बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत. मात्र, वाढती महागाई पाहता, काही महिलांनी यावेळी खरेदी नको रे बाबा, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गुढीपाडव्याला विक्रमी सोन्याच्या दागिन्याची विक्री झाली होती. आताही होईल असा विश्वास सराफा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. लग्नसराईचे दिवस आहेत. या खरेदीसाठी अनेकांनी या दिवसाची निवड केली आहे. लग्न सोहळ्यासाठी तरी खरेदी होईल व गुंतवणूक म्हणून खरेदीची शक्यता असल्याचे सराफ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोने प्रति दहा ग्रॅम ५१ हजारांवर गेले आहे. चांदी प्रति किलो ६३ हजार ५०० वर गेली आहे.
सोने उत्कृष्ट गुंतवणूक
सोन्याच्या गुंतवणुकीला उत्तम मानले जाते. कारण कोणत्याही परिस्थितीत त्यातून पैसे मिळू शकतात. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर त्या देशातील शेअर मार्केट बंद पडले, युक्रेनचे चलनही इतर देशात घेण्याचे नाकारले. तेव्हा ज्याच्या जवळ सोने आहे. त्यांच्याजवळील सोनेच त्यांना अडचणीच्या वेळी कामी आले, हे या युद्धाच्या स्थितीत पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे सोन्याला `जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी‘ असे म्हटले जाते, असे रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी म्हटले आहे.
Web Title: Akshay Tritiya Will Have Suitable Time To Buy Gold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..