Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024esakal

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेला सोन्यातील गुंतवणूक मोलाचीच.!

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करण्याची परंपरा तंत्रज्ञानाच्या युगात आजही कायम आहे.

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनेखरेदी करण्याची परंपरा तंत्रज्ञानाच्या युगात आजही कायम आहे. कृत्रीम बुद्धीमत्ता, ऑनलाईनच्या जगात खरेदीच्या पद्धती बदलत असल्या तरी या दिवशी सोने खरेदी करण्याचे महत्त्व कायम आहे. सोने खरेदीची ही परंपरा केवळ श्रद्धा आणि संस्कृतीपुरती मर्यादित नसून ती गुंतवणुकीकडे पाहण्याचा व्यावहारिकताही त्यात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

साडेतीन मुहुर्तांसह लग्न, वाढदिवस आणि सांक्षगंघ, दिवाळीलाही सोन्याचे दागिने खरेदीवर भारतीयांचा भर असतो. दागिन्यांच्या स्वरूपात केलेली सोन्याची खरेदी ही केवळ गुंतवणूक नसते, तर तिच्याकडे सामाजिक प्रतिष्ठेचे चिन्ह म्हणूनही बघितले जाते. गुंतवणूक म्हणून सोनेखरेदी करताना नाणी, वळी, बार किंवा बिस्कीट स्वरूपात घेतले जाते.

यामुळे ते विकताना घडणावळ, घट असे नुकसान होत नाही. या पारंपरिक मार्गांशिवाय विविध प्रकारची गुंतवणूक करता येते. त्यात गोल्ड ईटीएफ, गोल्ड बाँड, डिजिटल गोल्ड, म्युच्युअल फंड असे पर्याय समोर आलेले आहे.

Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024 : आज सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह, जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

गोल्ड ईटीएफ

कागदी स्वरूपात असणाऱ्या सोन्याचे निदर्शक म्हणून ‘गोल्ड ईटीएफ’चा वापर केला जातो. सामान्यतः एक ‘ईटीएफ’ युनिट म्हणजे एक ग्रॅम सोने होय. हे ‘गोल्ड ‘ईटीएफ’ युनिट स्टॉक एक्स्चेंजमध्ये कधीही खरेदी किंवा विक्री करता येतात.

सॉव्हरिन गोल्ड बाँड

भारत सरकारने सोन्यातील गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय सार्वभौम सुवर्णरोख्यांच्या (सॉव्हरिन गोल्ड बाँड) माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात हे रोखे जतन केले जातात आणि सोन्याच्या सुरुवातीच्या किमतीवर ठराविक व्याजही दिले जाते. या रोख्यांची मुदत आठ वर्षे असते. यावर करसवलतही मिळते.

डिजिटल सोने

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आता अत्याधुनिकतेच्या युगात डिजिटल गोल्ड या पर्यायाला पसंती दिली जात आहे. याची ऑनलाइन खरेदी करता येते. हे सोने विक्रेते एका सुरक्षित व्हॉल्टमध्ये ठेवतात.

डिजिटल गोल्ड हवे तेव्हा खरेदी करता येते आणि विकताही येते. काही काळानंतर त्याचा साठा गुंतवणूकदारांकडे तयार होतो. हे विकत असताना अथवा खरेदी करताना त्यावर जीएसटी अथवा घडणावळ शुल्क आकारले जात नसल्याने या अतिरिक्त खर्चापासून ग्राहकांची सुटका होते. डिजिटल सोने विकताना असलेल्या दरानुसान ते विकता येते.

गोल्ड म्युच्युअल फंड

गोल्ड म्युच्युअल फंड हे सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्या व ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करतात. प्रत्यक्ष सोने विकत न घेता सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा म्युच्युअल फंडाचा सोपा पर्याय उपलब्ध आहे.

कोणत्याही स्वरूपातील सोने खरेदीचा निर्णय घेताना, तो तुमच्या गुंतवणुकीच्या नियोजनाशी, आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत असणे आवश्‍यक आहे. त्या गुंतवणुकीतील जोखमीचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना आर्थिक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

सोन्याची गुंतवणुक करण्याची ही उत्तम संधी आहे. सोन्याचे भाव आता ७० हजारांच्यावर स्थिरावलेले आहे. त्यामुळे भाव कमी होतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. सोन्याच्या गुंतवणुकीचे विविध प्रकार जरी आले असले तरी ‘टच ॲण्ड फिल'' चा आनंद जो आहे तो त्या पर्यायामध्ये येऊ शकत नाही.

पर्यायामुळे त्या सोन्याचा वापर आपल्याला करता येत नाही. प्रत्यक्ष सोने खरेदी केल्यास त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर एक हजारपेक्षा अधिक ग्राहकांनी दागिन्यांची आणि सोन्याची बुकिंग केलेली आहे.

-राजेश रोकडे, उपाध्यक्ष जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉन्सिल

अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा जुनी आहे. यामुळे सोने खरेदीवर सर्वांचाच भर असतो, ती गुंतवणूक म्हणून असो की नियमित वापर, लग्न सराईसाठी. या दिवशी सोने खरेदी केल्याने कायम सर्वांच्या आर्थिक स्थितीमध्ये वृद्धीच झालेली आहे. सोन्याचे भाव वाढलेले असले तरी ग्राहकांची खरेदीचा कल कायम वाढतच असतो.

- भरत सेठ, व्यवस्थापकीय संचालक, बटुकभाई ज्वेलर्स

वाढलेले भाव आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून यंदा सोन्याच्या खरेदीला पसंती मिळत आहे. अक्षयतृतीयेचा मुहूर्त खरेदीसाठी साधला आहे.

-आशिष लेले, संचालक, लेले ज्वेलर्स

Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com