esakal | निकालातील वाढ अकरावी प्रवेशाच्या पथ्थ्यावर, सर्व रिक्त जागा भरणार
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

निकालातील वाढ अकरावी प्रवेशाच्या पथ्थ्यावर, सर्व रिक्त जागा भरणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दहावीच्या निकालामध्ये (nagpur division 10th result) विभागाचा निकालात ६ टक्क्यांनी वाढ झाली. ही वाढ यंदा अकरावी प्रवेशाच्या (11th class admission) पथ्थ्यावर पडणार आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या २४ हजारावर जागा रिक्त असल्याचे दिसून आले. मात्र, आता विद्यार्थ्यांची वाढलेली टक्केवारी आणि निकालाने या सर्व जागा भरणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे. (all colleges will have full admission for eleventh class due to increased in tenth class result)

हेही वाचा: अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

शहरात अकरावीच्या ५९ हजार २५० जागांचा समावेश आहे. त्यापैकी गेल्यावर्षी २४ हजार ४१६ जागा रिक्त राहील्या होत्या. केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरीसह ‘फस्ट कम फस्ट सर्व्ह' फेरी घेण्यात आली. त्यानंतरही रिक्त जागांची संख्या जास्त असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रोष निर्माण झाला होता. मात्र, यावर्षी कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर करण्यात आले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासक्रमावर फोकस केले, त्यांना याचा फटका बसला. मात्र, नववीमध्ये अधिक गुण असलेल्यांना लॉटरी लागली. त्यातून जे द्वितीय श्रेणीत होते. तेही प्रथम आणि प्राविण्यात आलेत. विभागात याची संख्या १ लाख २५ हजार ९२१ इतकी आहे. त्यामुळे याचा फायदा यावर्षी अकरावी प्रवेशात कनिष्ठ महाविद्यालयांना मिळणार आहे.

विज्ञान, वाणिज्यमध्ये गर्दी वाढणार -

दरवर्षी विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमाकडे असतो. त्यामुळे नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी चुरस असते. निकाल वाढल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या टक्केवारीतही वाढ झाल्याने ती चुरस आणखीच वाढून महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मोठी गर्दी दिसून येणार आहे. तसेच प्रत्येकच विद्यार्थ्यांला चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाची आस असेल चित्र निर्माण झाले आहे.

पॉलिटेक्निक, आयटीआयमध्येही गर्दी वाढणार -

अकरावीप्रमाणे यावर्षी पॉलिटेक्निक आणि आयटीआयमध्येही विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येणार आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकमध्ये असलेली रिक्त जागांची संख्या घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूण जागा - ५९,२५०

  • कला - ९,६६० - रिक्त जागा - ५,६४०

  • वाणिज्य - १७,९२० - रिक्त जागा - ७,९५३

  • विज्ञान - २७,३३० - रिक्त जागा - ८,७१४

  • एमसीव्हीसी - ४,१३० - रिक्त जागा - २,१०९

एकूण रिक्त जागा - २४,४१६

loading image