esakal | आजपासून दुपारी १ वाजेनंतर दुकाने, बाजारपेठा बंद; फक्त मेडिकल्स राहतील सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

आजपासून दुपारी १ वाजेनंतर दुकाने, बाजारपेठा बंद; फक्त मेडिकल्स राहतील सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोविडचे रुग्ण वाढतच चालले असल्याने आता औषधे वगळून अत्यावश्यक सेवा देणारी सर्व दुकाने व बाजारपेठा दुपारी एक वाजतानंतर बंद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. आजपासून या अधिक कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: दादागिरी करणाऱ्या दबंग तरूणीचा भर चौकात खून; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

सामुदायिक संसर्ग वाढत चालला असल्याने संचारबंदी अधिक चुस्त केली जाणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त आदेश काढले आहेत. शहरातील कोरोनाची परिस्थिती बघता आता कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. विनाकारण रस्त्‍यांवर फिरणाऱ्यांवर कारवाई आणि जागोजागी नाकाबंदी करण्यास पोलिसांना सूचना केली आहे.

वर्धा येथे जम्बो हॉस्पिटल -

वर्धा येथील लॉयड स्टील प्लांटमध्ये ऑक्जिसन साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वर्धा येथेच जंबो इस्पितळ स्‍थापन करण्याची तयारी सुरू आहे. विभागीय आयुक्त यांच्या नेतृत्वात एक चमू पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. याशिवाय मानकापूर स्टेडियम येथेही जम्बो इस्पितळ उभारण्याची तयारी केली जात आहे. तालुकास्तरावरही बेड वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

कोराडी, खापरखेडा विद्युत केंद्रातून ऑक्सिजनची निर्मिती -

कोराडी आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे कॉम्प्रेसर स्थापन केल्यास एक हजार ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होऊ शकतात. चीन, जर्मनी आणि रशिया या देशात या कॉम्‍प्रेसरची निर्मिती होते. या संदर्भात चीनच्या एका कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे. याचा वापर वीज उत्पादनासाठीही केला जातो. त्यामुळे याचा खर्च ऊर्जा विभागामार्फेत केला जाईल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

loading image
go to top