

Nagpur News
esakal
अंबाडा: कापसाच्या दराने थेट ८,३०० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला आहे. डॉलरचे वाढते मूल्य, क्रूड ऑइलच्या दरातील तेजी आणि सरकीच्या दरवाढीमुळे कापसाला अचानक उठाव मिळाल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचा दर ७१ सेंट प्रति पाउंडवर पोहोचल्याने हंगामात प्रथमच कापसाच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील बदलत्या समीकरणांमुळे एकाच वेळी ७०० ते ८०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने कमोडिटी बाजारावर त्याचा थेट परिणाम झाला.