'भाऊ, आता सिलींडरचं अनुदान जमा होत नाही का?' नागरिकांचा सवाल; खिशाला चुना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती गॅस सिलींडरचे दर वाढणे व त्याचे अनुदान एकदम कमी मिळणे, ही बाब सामान्य नागरिकांसाठी न परवडणारी असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. एका घरगुती गॅस सिलींडरला घेण्यासाठी ग्राहकांना मार्च, एप्रिल या महिन्यामध्ये ७६९ रुपये मोजावे लागत होते. त्य

घरगुती गॅस सिलींडरचे दर वाढणे व त्याचे अनुदान एकदम कमी मिळणे, ही बाब सामान्य नागरिकांसाठी न परवडणारी असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. एका घरगुती गॅस सिलींडरला घेण्यासाठी ग्राहकांना मार्च, एप्रिल या महिन्यामध्ये ७६९ रुपये मोजावे लागत होते. त्याच स्थितीत ग्राहकांच्या खात्यात अनुदान म्हणून १९९ रुपये जमा होत होते.

'भाऊ, आता सिलींडरचं अनुदान जमा होत नाही का?' नागरिकांचा सवाल; खिशाला चुना

टाकळघाट (जि. नागपूर) : शासनातर्फे घरगुती गॅस सिलींडरचे अनुदान हळूहळू कमी करण्यात आले. त्यामुळे शासनाच्या या कृत्यामुळे नागरिक पेचात पडले असून 'भाऊ आता गॅस सिलींडरचे अनुदान खात्यात जमा नाही होत का, ग्राहक अशी विचारणा करीत आहे. घरगुती सिलींडरवर मिळणारे अनुदान टप्या-टप्याने कमी करीत २७० रुपये मिळणारे अनुदान आता फक्त २० रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे आता अनुदानच बंद करण्याचे चित्र दिसत आहे.

घरगुती गॅस सिलींडरचे दर वाढणे व त्याचे अनुदान एकदम कमी मिळणे, ही बाब सामान्य नागरिकांसाठी न परवडणारी असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. एका घरगुती गॅस सिलींडरला घेण्यासाठी ग्राहकांना मार्च, एप्रिल या महिन्यामध्ये ७६९ रुपये मोजावे लागत होते. त्याच स्थितीत ग्राहकांच्या खात्यात अनुदान म्हणून १९९ रुपये जमा होत होते.

हेही वाचा - अमरावतीनंतर आता यवतमाळचीही लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; हे नियम पाळा अन्यथा कडक निर्बंध 

सन २०२१ च्या जानेवारी महिन्यात ७४६ रुपयात घरगुती सिलींडर मिळत होते. परंतु त्याचे अनुदान बँक खात्यात फक्त ४० रुपये १०पैसे जमा होत असताना ग्राहक चिंतेत सापडला आहे.

फेब्रुवारी महिन्यात सिलींडरचे दर दोनदा वाढले. ४ फेब्रुवारीला २५रुपये तर १५ तारखेला ५० रुपयांची भर पडल्याने सिलींडरची किंमत ८२१ रुपये झाली असताना अनुदानामध्ये काहीच बदल झालेला दिसत नाही. सामान्य नागरिकांना एका वर्षांमध्ये अनुदानित१२ सिलींडरची तरतूद आहे. परंतु ग्राहकांना एका वर्षात ७ ते ८ सिलींडर लागत असतात. काही मोठ्या कुटुंबीयांना १२पेक्षा अधिक लागतात. हिवाळ्यात घरगुती गॅस सिलींडरची मागणी इतर दिवसांच्या तुलनेत अधिक असते. परंतु आता वाढते दर लक्षात घेता गृहिणींनी थोडा ‘ब्रेक’ लावीत मागणी कमी झाल्याचे ऐकू येते.

नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद

कोरोनाच्या संकटामुळे आमची आर्थिक परिस्थिती कोलमडली. सिलींडरच्या किमती वाढल्या असल्याने हिंमत होत नाही. एकतर अनुदार न मिळण्यासारखे आहे. त्यामुळे 'अच्छे दिन' ऐवजी 'बुरे दिन'बघायला मिळत आहेत.
संतप्त ग्राहक

संपादन - अथर्व महांकाळ 


 

Web Title: Amount Cylinder Subsidy Getting Reduced Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bank
go to top