अमरावती : 'ब्रेकअपमुळे प्रियकराने केली बदनामी'अश्लील व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

अमरावती : 'ब्रेकअपमुळे प्रियकराने केली बदनामी'अश्लील व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सात वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण असताना अश्लील व्हिडीओसह काही खासगी फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून युवतीची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी सद्य:स्थितीत अमेरिकेत राहणाऱ्या युवकाविरुद्ध अत्याचार, विनयभंग, बदनामीप्रकरणी गुन्हा दाखल केला.

राज ज्ञानेश्वर धोंडे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. पीडित महिला पतीसह घरी असताना काही महिन्यांपूर्वी पतीच्या ईमेलवर एक मेल आला. त्यात असलेली लिंक ओपन करताच त्यात पीडितेचे काही खासगी फोटो आणि अश्लील व्हिडिओ दिसले. घडलेल्या घटनेमुळे घाबरलेल्या पीडितेने पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यात शिक्षण घेत असताना २०१४ मध्ये तिची ओळख संशयित आरोपीसोबत झाली. त्यावेळी तो अमरावतीत राहात होता. पदवीच्या शिक्षणानंतर राज अमेरिकेत नोकरीसाठी गेला. २०१५ मध्ये तो पुन्हा अमरावतीत आला.

हेही वाचा: अमरावतीत फटाके फोडण्यावरून वाद ; पाहा व्हिडिओ

पीडितेची भेट घेऊन त्याने लग्नाची मागणी केली. पीडितेने तेव्हा त्याला लग्नास नकार दिला. परंतु मैत्री सुरूच होती. घरी बोलावून त्याने पीडितेच्या मोबाईलमधील डाटा स्वत:कडे घेतला. त्यात पीडितेचे काही खासगी फोटो होते. त्याआधारे राजने भाड्याच्या खोलीवर नेऊन धमकी देऊन अत्याचार केला. त्याचे चित्रीकरण केले. फोटो व्हायरल करण्याची तेव्हा धमकी दिली होती. भांडण होऊन त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते, असे पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जुलै २०२१ मध्ये राजने पीडितेचे खोटे फेसबुक अकाउंट तयार करून त्यावरून व्हीडीओ व्हायरल करून बदनामी केली, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला.

हेही वाचा: "शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी"

आधी पुण्यात केली होती तक्रार

पीडीतेने यापूर्वी पुण्याच्या चतुःश्रृंगी पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु घटनास्थळी अमरावतीपासून सुरू झाल्याने पुणे पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीसाठी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर गुन्हा दाखल झाला

loading image
go to top