"शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी" दरेकरांचा मुख्यमंत्र्यावर घणाघात | ST Strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pravin darekar

"शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी"

मुंबई : भावनिक बोलून एसटी कर्मचारी (st employee strike) यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना (shivsena) उभी राहीली आहे. त्यामुळे आम्हाला पोळी भाजण्याची गरज नाही. असा घणाघाती आरोप भाजपचे प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर केला आहे.

एकीकडे एसटी बंद ठेवायची अन् दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन

महाराष्ट्र परिवहन मंडळ हे देशातील सर्वात मोठं महामंडळ आहे. त्यात काही लिकेजस आहे. व्यवस्थित केलं तर सर्व काही व्यवस्थित करता येईल. सध्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचं. यातुन काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत यांनी आतापर्यंत कोणत्याही रचनात्मक कामावर मिडीयावर बोलले नाही. म्हणुन त्यांनी फक्त टीका टिपणीच केली आहे असा आरोप दरेकरांनी यावेळी केला.

हेही वाचा: मागच्या जन्मात पाप केलेला माणूस साखर कारखाना काढतो किंवा... - गडकरी

ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानीबाबत काय बोलायचं

नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत. ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचं असा सणसणीत टोला दरेकरांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर लगावला.

हेही वाचा: बांदेकर भावोजींसमोर रामदास आठवलेंचा मजेदार उखाणा

loading image
go to top