Amravati Crime News
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींचा विवाहाचे (Child Marriage Melghat) प्रमाण वाढत असल्याने त्याचा फटका मातेसह अपत्यांनाही बसतो. एका अल्पवयीन मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला. चिखलदरा ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली. मेळघाटमधील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात अल्पवयीनांनी विवाहकरुन सोबत राहणे किंवा विवाह न करता सोबत राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.