अमरावतीच्या नमुना गल्लीमध्ये निघाले शस्त्र; आता तणावपूर्ण शांतता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरावती बंद

अमरावती बंद : नमुना गल्लीमध्ये निघाले शस्त्र; आता तणावपूर्ण शांतता

नागपूर : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावतीमध्ये मुस्लीम संघटनांनी मोर्चा काढला होता. यावेळी दुकान बंद करण्यावरून दगळफेक करण्यात आली होती. शनिवारी बंद घोषित केल्यानंतरही चांगलेच वादंग निर्माण झाले. एकूणच या प्रकरणाला हिंसक वळण आले आहे. नमुना गल्लीमध्ये एका गटाने शस्त्र बाहेर काढल्याने दुसऱ्या गटाने दगडफेक केल्याची माहिती आहे.

राजकमल चौकात पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवल्यानंतर जमाव मिळेल त्या वाटेने पळत गेला. लोक विखुरले गेले. काही लोक राजकमल चौकानजीक असलेल्या नमुना गल्लीमध्ये गेले. तेथे एका गटातील काही युवकांनी शस्त्र काढले, तर दुसऱ्या गटाने त्यांच्यावर दगडफेक केली. यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली.

हेही वाचा: अमरावतीत बंदला हिंसक वळण; यशोमती ठाकूर म्हणाल्या...

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. त्यानंतर शहराच्या काही भागांत दगडफेक झाली. त्यात व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजप तसेच अन्य संघटनांसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध केला.

राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून निदर्शने केली. शहरातील नमुना परिसर, जवाहर गेट, गांधी चौक भागामध्ये फिरून किरकोळ स्वरूपात फुटपाथवर असलेल्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न जमावाने केला. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. आंदोलनाच्या निमित्ताने शहराच्या सर्वच चौकांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा: रश्मी देसाईचा ट्यूब ब्रामध्ये बोल्ड फोटोशूट

माजी पालकमंत्री व भाजप नेते जगदीश गुप्ता शेकडो समर्थकांसह अमरावती बंदमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. आता अमरावतीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

loading image
go to top