Chandrashekhar Bawankule
sakal
नागपूर : अमरावती महापालिका निवडणुकीतील पराभवाचे सखोल विश्लेषण केले जाईल. पराभूत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाईल. यासाठी विशेष चौकशी टीम पाठवण्यात येईल. कोणी विरोधात काम केले याची सखोल चौकशी करू. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.