अमरावती : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार वाढीव मदतनिधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

अमरावती : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार वाढीव मदतनिधी

अमरावती : गतवर्षी खरीप हंगामात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील शेतपिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. नागरिकांनाही फटका बसला होता. बाधितांना मदतीसाठी वाटप करावयाच्या निधीत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावती विभागासाठी ५५ कोटी २५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

गत वर्षीच्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान अकोला जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यास फटका बसला. वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात तुलनेने अत्यंत कमी नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यातीलही नुकसान कमी झाले. अकोला व अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्यात; तर काही ठिकाणी सोयाबीन, मूग व उडीद या पिकांची नासाडी झाली. घरांची पडझड व वीज पडून जीवितहानीच्या घटनाही घडून वित्तहानी झाली. या बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने तातडीने मदत म्हणून ११८ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याचे वितरणही झाले. मात्र, या बाधित भागास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून वाढीव मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.

अमरावती विभागास तब्बल ५५ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सर्वाधिक नुकसानाची झळ पोहोचलेल्या अकोला जिल्ह्यास सर्वाधिक ३९ कोटी ३० लाख रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत जुलै महिन्यातील नुकसानापोटी एकूण १७३ कोटी ६७ लाख रुपये मंजूर केले आहेत. यातील ११८ कोटी ४१ लाख रुपयांचे वितरण झाले आहे. आता वाढीव निधी ५५ कोटी २५ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय मंजूर वाढीव मदत निधी (रुपये कोटी)

  • अकोला : ३९.३०

  • अमरावती : ११ :२५

  • यवतमाळ : ३.७९

  • बुलडाणा : ०.१७

  • वाशीम : ०.७१

Web Title: Amravati Farmers Affected Heavy Rain 55 Crore 25 Lakh Relief Fund

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top