Navneet Rana: ए भैय्या भाभी औकतीत राय नाई त..." घरी किराणा पाठवणाऱ्या राणा दाम्पत्याला यशोमती ठाकुरांनी सुनावलं
Yashomati Thakur: अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी किराणा किट वितरण केले; माजी मंत्री यशोमती ठाकूर संतापलेल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याचा सल्ला देत त्यांनी राजकीय नाटक थांबवण्याची मागणी केली आहे.
अमरावती : दिवाळीच्या पर्वावर माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावतीने नागरिकांना देण्यात येणाऱ्या किराणा साहित्याची किट माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या घरीसुद्धा देण्यात आली.