Amravati: कर्मचारी महिलेवर सहकाऱ्याकडून अत्याचार प्रकरण ! आरोपीला ५ वर्षांनी सुनावण्यात आली शिक्षा

Amravati: कर्मचारी महिलेवर सहकाऱ्याकडून अत्याचार प्रकरण ! आरोपीला ५ वर्षांनी सुनावण्यात आली शिक्षा

२०१८मध्ये घटस्फोटित महिलेवर झाला होता अत्याचार, आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

Amravati Crime News: घटस्फोटित महिलेच्या घरात शिरून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने (क्रमांक पाच), आरोपी संदीप लक्ष्मण परतेकी (वय ३४, रा. कारंजालाड, जि. वाशीम) याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

न्यायाधीश श्रीमती पी. एन. राव यांच्या न्यायालयाने बुधवारी (ता. २९) हा निर्णय दिला. शहरातील फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत ही घटना ३ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली होती. फ्रेजरपुरा पोलिसांनी ४ डिसेंबर २०१८ रोजी याप्रकरणी संदीप परतेकी विरुद्ध अत्याचार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

पीडित घटस्फोटित महिला आणि संदीप परतेकी हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. पीडिता ही काम करीत असताना घटनेच्या १५ दिवसांपूर्वी संदीपने तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडितेने कामावर जाणे बंद केले होते. तीन डिसेंबरला घटनेच्या दिवशी पीडित महिला घरी असताना संशयित संदीपने तेथे पोहोचून कामावर न येण्याबाबत विचारणा केली.

नंतर दार बंद करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून जिवाने मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर दोन तासांनी पीडिता रडत असल्याचे एका महिलेस दिसले. तिने घटनाक्रम सांगितला. पीडितेने फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक नीलिमा सातव यांनी याप्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. (Latest Marathi News)

Amravati: कर्मचारी महिलेवर सहकाऱ्याकडून अत्याचार प्रकरण ! आरोपीला ५ वर्षांनी सुनावण्यात आली शिक्षा
Sunil Tatkare: "पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना..."; सुनील तटकरे यांचा मोठा खुलासा, संपूर्ण इतिहास मांडला

सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. प्रफुल्ल प्रकाश तापडिया यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश श्रीमती पी. एन. राव यांनी आरोपी संदीप परतेकी याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. याप्रकरणात पैरवी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक गजानन नागे, अरुण हटवार यांनी सहकार्य केले.

न्यायालयाने आरोपीस विविध कलमान्वये एकूण पाच हजार रुपयांचा दंडसुद्धा ठोठावला. दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्यानंतर ती रक्कम पीडितेस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.-अ‍ॅड. प्रफुल्ल तापडिया, अतिरिक्त सरकारी वकील, अमरावती. (Latest Marathi News)

Amravati: कर्मचारी महिलेवर सहकाऱ्याकडून अत्याचार प्रकरण ! आरोपीला ५ वर्षांनी सुनावण्यात आली शिक्षा
Narayana Murthy: 70 तासांच्या वक्तव्यानंतर आता नारायण मूर्ती म्हणाले, ''काहीही फुकट देऊ नये, मी पण....''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com